दसरा! चांगल्या गुणांचा वाईट गुणांवर, सत्याचा असत्यावर, आणि सतबुद्धीचा दुर्बुद्धीवर विजय, त्यामुळे आपण, खरं तर काही लोक रावणाचे किंवा त्याच्या पुतळ्याचे दहन करतात. वाईट काहीच नाही. पण कालानुरूप काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. किती दिवस रावणाच्या पुतळ्याला जाळत राहणार? तो संपला, आता गरज आहे ती आपल्या आजूबाजूच्या रावणाला जाळण्याची, आपल्यामधल्या रावणाला शोधायची आणि त्याला जाळण्याची. आपल्यामध्ये रावण असण्यासाठी आपण फक्त सीतेचे किंवा आणखी कुणाचे हरण केलेलेच असले पाहिजे असे काही नाही. आपल्यामध्ये रावण अनेक प्रकारे वास करू शकतो. नाहीतरी रावण म्हणजे तरी काय? वाईट गुण, असत्य, दुर्बुद्धी, आपल्यातला आळस. रावण होता कि नव्हता ह्यात मला जायचे नाही. पण आपण जाळत असलेला रावण पण तर वरील सर्व वाईट गोष्टींचं प्रतीकच आहे नं?
कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करायची असते. हे मी का सांगतो? कारण मी आसपासचे रावणपण शोधायला सांगितले होते, नक्की शोधा, पण आधी आपल्यामधले. तसे आपण अगदीच रावण नाही, आणि रावण नाही म्हणून राम आहात ह्या भ्रमात पण राहू नका. आपल्यातल्या रावणाला मारण्यासाठी मात्र आपल्यात असलेला राम जागवणे फार गरजेचे आहे. आपल्यात रावण कोणत्या रूपात असू शकतो ह्याला भरपूर पर्याय आहेत. जसे दुष्क्रुत्य किंवा दुष्कर्म करणे, खोटं बोलणे, चोरी करणे, कुणाला उगाच त्रास देणे, कुणाचा उगाच द्वेष करणे, आधुनिक युगात विचार करायचे झाले तर, टॅक्स चोरी करणे, फेक पोस्ट वायरल करणे ई.
पण मला आत्ता जो दुर्गुण आपल्यात असतो, आणि ज्याच्याकडे खुप गांभीर्याने बघण्याची गरज असते, पण आपण दुर्लक्ष करतो, आणि ती म्हणजे आरोग्याबद्दल अनास्था. आज भारतात म्हणा किंवा एकूणच जगात म्हणा, अनारोग्यामुळे करोडो रुपयांचा चुराडा होतो किंवा, उत्पादकता घटते. आपले आर्थिक नुकसान होते, घरातील एक माणूस इस्पितळात दाखल केला तर पूर्ण परिवार आजारी असल्यासारखा अस्वस्थ असतो. आपण आरोग्य विमा घेतो, आणि बऱ्याच वेळा स्वस्थ बसतो, अरे दहा लाखांचा विमा आहे, काय फरक पडतो? विमा असणं कधीही चांगलं, पण विम्याचे पैसे वसूल न होणे हे त्याहून अधिक महत्वाचे. म्हणजे? म्हणजे भले तुम्ही पंधरा-वीस-पंचवीस हजार खर्चून पॉलिसी घ्या, पण त्यासाठी आजारी व्हायलाच हवं काही गरजेचं नाही नं?
हल्ली निरोगी राहण्यासाठी खुप मार्ग अवलंबले जातात, त्यातला पोटाला मारण्याचा उपाय मला पटत नाही, हे खाऊ नका, ते खाऊ नका, इतक्या वेळाच खा आणि इतक्या वेळेतच खा. ह्या सर्व गोष्टी मनाला पटत नाही. त्यामुळे त्या तुम्ही करा हे मी सुचवणार सुद्धा नाही. माझा स्वतःपुरता मंत्र म्हणाल तर भरपूर खा, सर्व खा आणि ते पचवा, पचवा म्हणजे कोणत्या बाबाचं चूर्ण किंवा पाचक द्रव्य घेऊन नाही. कष्ट करून! व्यायाम, अगदी चालणे, पळणे, सायकल चालवणे, पोहणे, योगा करणे (हा प्रकार मला तितकासा पटत नाही पण त्याने काही जणांना हजारो करोड कमावून दिले म्हणजे तो चांगलाच असणार), किंवा व्यायामशाळेत जाऊन करायचा व्यायाम करा. मुख्य म्हणजे आनंदी राहा, हसत राहा, आपल्या भोवतालचे वातावरण प्रसन्न राहील असा प्रयत्न करा.
आमचा एक सायकल गृप आहे, सुट्टीच्या दिवशी किंवा जमेल तसं सायकलिंग आम्ही करतो. सायकलिंगचे अनेक फायदे आहेत, हृद्य आणि फुप्पुसे तंदुरुस्त राहतात, आपल्या स्नायूला बळकटी येते, आपला स्टॅमिना वाढतो, मेंदू तल्लख होतो (हे तुम्हीच ठरवा), सर्वात महत्वाचे म्हणजे वजन घटते. हे सर्व करताना आमचा वेळही खर्ची पडत नाही, एरवी सुट्टीच्या दिवशी नऊ वाजेपर्यंत बिछान्यात लोळणारे आम्ही, आता साडेपाच-सहाला घर सोडतो, सायकलिंग करतो, बाहेर नाश्ता करतो, अगदी काहीही खातो, कारण पचायची खात्री असते आणि नऊ-साडेनऊपर्यंत घरी परत! मागच्या काही वर्षात सायकल उद्योगाची भरभराट होताना दिसते, कारण हेच कि लोक आरोग्याबद्दल जागरूक होताहेत, आजार होऊन, विमा आहे, किंवा सरकारी योजना आहे, तिथून खर्च भागला तर ठीक, नाहीतर कर्ज घेऊन, जमिनीचा तुकडा विकून खर्च भागवावा लागतो, पैसा आणि शरीराचे अतोनात न भरून येणारे नुकसान होते. आजार झालेच नाही तर? किती छान नं? ते थोडे कठीणच आहे, पण कमीत कमी वेळा आजारी होणं आपल्या हातात आहे.
आमचा मित्र राजेश चुरी याने मागील वर्षी अभिनव योजना ठरवली. दसरा पहाट, दिवाळी पहाट हल्ली खुप चालतात, आम्ही वेगळी दसरा पहाट साजरी करायची ठरवली, सायकल प्रवासाने! ह्यावर्षी पुन्हा आम्ही आजची दसरा पहाट थोड्या खडतर मार्गाने साजरी करायची ठरवले, साधारण चव्वेचाळीस किलोमीटर सायकलिंग आणि डहाणूच्या गडावरील महालक्ष्मी मातेचे साधारण अर्धा ते एक तासाची (आपापल्या क्षमतेप्रमाणे) चढाई करून दर्शन, असा कार्यक्रम ठरवला. सोळा ते बावन्न वयोगटातील नऊ लोकांनी हे केलं. खरं सांगतो एक कमालीचं समाधान मिळतं, आणि हो सायकलिंग करायचं तर घरापासून लांबच जायला हवं, घराजवळ केल्यास कधीही परत जायची ईच्छा असते पण लांब गेलात तर परतीचे दोर कापलेले असतात. तुम्हाला तितकं अंतर कापावंच लागतं.
तर मग? पटलं का? आरोग्याची काळजी घ्यायला हवी नं? आणि कधीही उद्यापासून असा विचार करू नका. उद्या कधीच येत नाही. आजपासून पण नाही, आत्तापासून! कुठलाही व्यायाम प्रकार करा, स्वस्थ रहा, आनंदी रहा, खरा रावण वेगवेगळ्या रूपात आपल्यात आहे ह्याची जाणीव असू द्या, त्यातल्या ह्या आरोग्याबद्दल अनास्था दाखवणाऱ्या रावणाला मारू या, थोडीशी इच्छाशक्ती आणि तुम्ही काहीही साध्य करू शकता. सगळे रावण एकावेळी मारू शकत नाही. एकेक निवडू या, संपवण्याचा प्रयत्न करू. अगदी राम बनणं सोप्प नाही पण रावण संपवणं तितकं कठीण देखील नाही, प्रयत्न करूया! दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा!

No comments:
Post a Comment